भारताच्या ऑलिम्पिकवीरांना सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट

August 28, 2016 1:21 PM1 commentViews:

Cq7RBVlXYAA2-_Y

28 ऑगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये चकमदार कामगिरी करणाऱ्या पी व्ही सिंधू, दिपा कर्माकर, साक्षी मलिक आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद यांना सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू गाडी भेट देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा रंगला.

हैदराबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिनचे मित्र चामुंडेश्वरनाथ  यांच्यातर्फे या ऑलिम्पिकवीरांना कार भेट दिल्या आहेत. गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत झालेल्या शानदार सोहळ्यात या गाड्यांचे वितरण करण्यात आले.

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीत बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद यांचे मोलाचे योगदान होते. तर साक्षी मलिकने कुस्तीत 58 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. जिम्नॅस्टीकमध्ये दिपा कर्माकरने चौथा क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी केली होती.

सचिन तेंडुलकरने या ऑलिम्पिकवीरांचे कौतुक केले. तुमच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान असून आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असे सचिन तेंडुलकरने सांगितलं.  यावेळी सचिनने चौघांसोबतही एक खास सेल्फीही काढला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sunil Pardeshi

    you can also give infrastructure for new players of any game that matters !