मुंबईतील रिक्षा-टॅक्सी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

August 28, 2016 5:44 PM0 commentsViews:

28 ऑगस्ट :  ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सेवा देणाऱ्या वाहतूकीवर निर्बंध घालावेत, या मागणीसाठी आज (रविवारी) मध्यरात्रीपासून मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचालक बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी पुन्हा एकदा कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

taxi-autos

जवळचं भाडं नाकारणं, अरेरावी, उर्मटपणा रिक्षा- टॅक्सीचालकांच्या वर्तनाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना ओला आणि उबरकडून अल्प दरात चांगली सेवा मिळते. मात्र यामुळे टॅक्सी-रिक्षाचालकांचा व्यवसाय घटत असून ओला-उबरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. परिवहन मंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानेच रिक्षा-टॅक्सीचालकांनी संपाचा पवित्रा घेतला असून टप्प्याटप्प्याने सर्व रिक्षा-टॅक्सी संपावर जातील असं सांगण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून जयभगवान ऑटो-टॅक्सी संघटना तर 30 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुंबई ऑटोमेन्स संघटनेचे सदस्य संपावर जाणार आहेत.

दरम्यान, या संपाचा मोठा फटका सामान्य मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनीही 31 ऑगस्टपासून संपाचा इशारा दिल्याने पुढचा आठवडा हा मुंबईकरांसाठी पायपिटीचा ठरणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा