अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे – शरद पवार

August 28, 2016 8:14 PM0 commentsViews:

Sharad pawar213

28 ऑगस्ट : अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत होत असलेली मागणी दुर्लक्षीत करण्यासारखी नाही. समाजातून ही मागणी येत असल्यामुळे विचारमंथन होणं गरजेचं आह, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. पण मोर्चांमधून अत्याचाराविरोधात उमटणाऱ्या प्रतिक्रियेची दखल सरकारने घ्यायला हवी असंही मत पवारांनी मांडलं. महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांवर राज्यातून आवाज उठण्यास सुरुवात होणे, ही सकारात्मक गोष्ट असल्याचं मतही पवारांनी मांडलं.

त्याचबरोबर, कॅन्सरशी कुस्तीसारखी लढाई केल्यास कॅन्सरच काय त्याच्या बापापासूनही सुटका मिळवता येते, असं मतही पवारांनी व्यक्त केलं आहे. आपल्याला लागलेली तंबाखूची सवय ही कॅन्सरपर्यंत कशी घेऊन गेली हे कळलेच नाही. भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून तंबाखूच्या व्यसनापासून दूर रहा असं आवाहनही पवारांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा