विलासरावांची फडणवीसांवर टीका

April 14, 2010 12:52 PM0 commentsViews: 1

14 एप्रिलपुण्यातील घोडे व्यापारी हसन अली संदर्भात भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याची टीका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे.नागपूरमध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. हसन अलीच्या चौकशीत त्याने आर.आर.पाटील, छगन भुजबळ, अहमद पटेल आदी नेत्यांची नावे घेतल्याचा आरोप काल फडणवीस यांनी सभागृहात केला होता. त्यासबंधीची सीडीही त्यांनी सभागृहात सादर केली होती.

close