जीएसटीमुळे अनेक करांपासून मुक्तता मिळेल, अर्थमंत्र्यांची ग्वाही

August 29, 2016 12:43 PM0 commentsViews:

Mungantiwar213

29 ऑगस्ट :  जीएसटीला मान्यता देण्यासाठी राज्यविधीमंडळाचं एकदिवशीय विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना, जीएसटीमुळे भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालता येईल. करांमध्ये सूसुत्रता येऊन व्यापारी आणि ग्राहकांना त्याचा थेट फायदा होईल. जीएसटीमध्ये एकूण 17 कर सामावले जातील. त्यामुळे राज्या राज्यातील जीवघेणी स्पर्धा कमी होईल, असं मुनगंटीवार म्हणाले.

जीएसटी विधेयक संसेदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं असून कायदा लागू होण्यासाठी 15 राज्यांच्या मंजुरीची गरज आहे. त्यापैकी 8 राज्यांनी आधीच मंजुरी दिली. महाराष्ट्र हे जीएसटीला मंजुरी देणारं नववं राज्य ठरेल, अशा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला.

सध्या 125 पेक्षा जास्त देशात जीएसटी आहे. Vat, करमणूक कर, केंद्रीय कर, प्रवेश कर,जकात, उपकर, अधिभार, excise duty,service tax सीमा शुल्क हे रद्द होऊन, एकच जीएसटीमुळे थेट फायदे मिळतील, असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुंबई महापालिकेची स्वायत्तता अबाधित राखली जाणार असेल तर जीएसटीला शिवसेनेची हरकत नसेल, अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

जीएसटीमुळे देशभर केवळ एकच करप्रणाली लागू होणार असून इतर सर्व करप्रणाली मोडकळीस पडणार आहे. जीएसटी 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्याचा केंद सरकारचा प्रयत्न आहे. गरिबांना जीएसटीचा फायदा सर्वाधिक होणार आहे. गरिबांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर कर बसणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा