सिंधू, दीपा, साक्षीला ‘खेलरत्न’, ललिता बाबरला अर्जुन पुरस्कार

August 29, 2016 2:58 PM0 commentsViews:

29 ऑगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, कुस्तीतील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, विशेष कामगिरी करणारी जिम्नॅस्ट दीपा कर्मकार आणि नेमबाज जितू राय यांना राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार, तर ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलिटिक्समध्ये अंतिम फेरीत 10 जणांमध्ये स्थान पटकावणारी महाराष्ट्र माण एक्स्प्रेस ललिता बाबरला ‘अर्जुन’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा पहिल्यांदाच चार खेळाडूंना ‘खेलरत्न’ने गौरवण्यात आलं.

Khel ratna1`23

‘अर्जुन पुरस्कारा’चे मानकरी

क्रिकेटर अजिंक्य रहाणे, बॉक्सर शिव थापा, हॉकीपटू रघुनाथ वोक्कालिगा, नेमबाज गुरप्रीत सिंग, नेमबाज अपूर्व चंदेला, टेबलटेनिसपटू सौम्यजित घोष, कुस्तीपटू विनेश फोगट, रजत चौहान, सौरव कोठारी, सुब्रतो पॉल, माजी कर्णधार राणी रामपाल, अमित कुमार, संदीपसिंह मान आणि विरेंद्र सिंग

‘द्रोणाचार्य पुरस्कारा’चे मानकरी

विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा, दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी, कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग, नागपुरी रमेश, प्रदीप कुमार

‘ध्यानचंद पुरस्कारा’चे मानकरी

सती गीता, सिल्वॅनस डुंग डुंग आणि राजेंद्र शेळके


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा