जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या

August 29, 2016 7:11 PM0 commentsViews:

sadha

29 ऑगस्ट :   जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळील मुंढव्यात घडली आहे. दोन वर्षांपासून जातीतून बहिष्कृत केल्यामुळे अरूण किसन नायकू यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे.

पंगुडवाले जातपंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्याशी जातीतील कोणीही बोलत नव्हते. आधीच बहिष्कृत झालेल्या आपल्या मित्राच्या लग्नाला गेल्याने जातपंचायतीने नायकूंवर बहिष्कार टाकला होता. अनेकदा विनंती करूनही आतापर्यंत जातपंचायतीने निर्णय कायम ठेवला होता. शेवटी दोन वर्षांनी या जाचाला कंटाळत गळफास घेत नायकू आत्महत्या केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा