मायनिंगसाठीचा पर्यावरण अहवाल खोटा

April 14, 2010 2:15 PM0 commentsViews: 6

दिनेश केळुसकर, रत्नागिरी14 एप्रिलसिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल मायनिंग प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तयार केलेला पर्यावरण अहवाल खोटा असल्याचे उघड झाले आहे. डोंगरपालमध्ये झालेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीत गावकर्‍यांनी या अहवालावरुन प्रशासनालाच धारेवर धरले. आता हा अहवाल तयार करणार्‍या एजन्सीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.डोंगरपाल मायनिंग अहवाल खोटा असल्याचा दावा करून गावकर्‍यांनी प्रशासनाला जाब विचारला. हा अहवाल खोटा असल्याचे अनेक पुरावे यावेळी सादर केले. हैदराबादच्या भगवती ऍनालॅब्सने तयार केलेल्या या पर्यावरण अहवालात मायनिंग प्रकल्पाचे स्थळ दिलेल्या भौगोलिक आकडेवारीनुसार चक्क अरबी समुद्रात दाखवले आहे.असा खोटा पर्यावरण अहवाल तयार करणार्‍या एजन्सीविरोधात आता डोंगरपाल गावकर्‍यांनी कोर्टात जाण्याची तयारी चालवली आहे.डोंगरपाल गावात न्यू इंडिया मायनिंग कंपनीला 1976मध्येच 96 हेक्टर क्षेत्रात मायनिंग लीज देण्यात आले. शिवाय याच गावात टाटा मेटालिक या कंपनीचाही मायनिंग प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कळणेप्रमाणेच या गावात मायनिंगवरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

close