पुण्यात भावाकडून बहिणीचा खून

April 14, 2010 2:24 PM0 commentsViews: 2

14 एप्रिलपुण्यातील हिंजवडी परिसरात भावानेच बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीचा खून केल्यानंतर या भावानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याने हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस जखमी झाला.सुबोजित बासू असे या इसमाचे नाव आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या त्याच्या बहिणीचे नाव प्रियदर्शनी आहे. हे दोघेही मूळचे कोलकात्याचे आहेत. जानेवारीपासून ते येथील अपराजिता अपार्टमेंटमध्ये राहत होते. सुबोजित हा आयआयटी खरगपूरचा विद्यार्थी असून तो पुण्यातील एनसीएलमध्ये कामाला होता.

close