बाबासाहेबांच्या विचारांतून घडले उद्योजक

April 14, 2010 2:39 PM0 commentsViews: 14

अद्वैत मेहता, पुणेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. आणि शिक्षण घेऊन स्वयंभू होण्याची प्रेरणाही. बाबासाहेबांची हीच प्रेरणा घेऊन पुण्यात डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना केली आहे. दलित समाजाच्या आर्थिक विकासासाठी हे नेटवर्क कार्यरत आहे. सरकारी नोकरी सोडून सोलर सिस्टीमच्या व्यवसायात उडी घेतलेल्या मुकुंद कमलाकर यांची आज 2 करोड रूपयांची उलाढाल आहे. सध्या पुण्यात जवळपास 4 हजार सोलर इक्विपमेंट्स कमलाकर यांच्या सूर्यटेक ब्रॅण्डची आहेत. सुरवातीला सहा महिने फायदा झाला नाही. रोज 70 ते 80 किलोमीटर सायकलवर फिरायचो. दीड ते दोन हजार रुपये मिळायचे. पण सहा महिन्यांनी दुकानच बंद झाले. मला कदम यांनी मदत केली आणि 2001 नंतर परत मागे वळून पाहिलेच नाही, असे मकुंद सांगतात. बाबासाहेबांची प्रेरणा घेत कमलाकर यांच्यासारखाच मूळच्या सोलापूरच्या अविनाश कांबळेंचा प्रवासही असाच खडतर होता. कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे अविनाश आज ते D.T.D.C या नावाजलेल्या कुरियर कंपनीचे सुपर फ्रेंचायजी आहेत. ते पुण्यातील 14 ब्रँचचे मॅनेजमेंट पाहतात. त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल आहे, जवळपास 2 1.5 करोड रूपये. कमलाकर आणि अविनाश यांच्याप्रमाणे सुमारे 250 यशस्वी उद्योजक आज डिक्कीचे सभासद आहेत. लवकरच या उद्योजकांच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शनही पुण्यात होणार आहे. डिक्कीचे अध्यक्ष आणि फॉर्च्युन कन्सट्रक्शनचे मालक मिलिंद कांबळे या तरुण उद्योजकांसाठी पुढाकार घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे तसेच दलित चळवळीमुळे पुढे आलेले हे दलित उद्योजक. आज खर्‍या अर्थाने आता संघटीत होऊन इतरांनाही आपल्यासोबत नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

close