कोपर्डीच्या निषेधार्थ बीडमध्ये भव्य मोर्चा

August 30, 2016 4:15 PM0 commentsViews:

beed morcha

30 ऑगस्ट : अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार आणि हत्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्यावतीने राज्यभर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबादनंतर आता बीड जिह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला.

बीडमधील या मोर्चामध्ये सर्वच स्तरातील घटकांनी उपस्थित राहून आपला निषेध व्यक्त केला. हा मोर्चा बीडच्या इतिहासात सगळ्यात मोठा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये ग्रामीण भागातील महिला मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या. तसंच यामध्ये प्राध्यापक, शेतकरी, असंख्य तरुणी, डॉक्टर, इंजिनिअर असे सर्वच स्तरातील व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला.

दरम्यान, मराठा समाजाने या मोर्चाची सुरुवात आधी कोपर्डी, औरंगाबाद, जळगाव आणि आता बीडमध्ये केली आहे. या मोर्चामध्ये अनेक मागण्या करण्यात येत होत्या. यामध्ये कोपर्डी बलात्कारप्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी द्या, तसंच अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा