गणपतीची मूर्ती आणताना शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू

August 30, 2016 1:26 PM0 commentsViews:

30 ऑगस्ट : उल्हासनगरमध्ये दोन गणेश भक्तांचा बाप्पाची मूर्ती आणताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरमधल्या ‘जय माता दी’ मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांना वाजत गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिणीचा तिघांना जोरदार धक्का बसला, यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

ÐûŸÖ¯ÖÖêê»ÖÖê

उल्हासनगर कॅम्प नं. 3 दसरा मैदान विभागातील मनिषनगर इथे ‘जय माता दी’ गणेश मंडळ आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाप्पाची उंच मूर्ती रात्री 9 च्या दरम्यान घेऊन येत होते. टॅनिंग पॉईंट इथे मूर्तीचा संपर्क उच्च दाबाच्या विद्युत वाहिणीसोबत आला. बाप्पाच्या मुर्ती जवळ उभे असलेले कार्यकर्त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला.

दरम्यान, विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगत स्थानिकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा