कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ‘टोलमाफी’

August 30, 2016 9:59 PM0 commentsViews:

gujrat_toll

30 ऑगस्ट :   कोकणात गणेशोत्सवाच्या काळात असंख्य वाहने येत असतात. त्यामुळे त्यांना एमएसआरडीसीकडून मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या टोलमाफीसाठी पोलीस आणि आरटीओकडून पास देखील देण्यात येणार आहे. येत्या 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरपर्यंत ही टोलमाफी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवादरम्यान हा निर्णय घेतला गेल्याने चाकरमान्यांना याचा फायदा होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा