भाजप आमदाराने पत्नीला गिफ्ट केलेल्या लॅम्बोर्गिनीला अपघात

August 30, 2016 10:17 PM0 commentsViews:

30 ऑगस्ट : नवऱ्यानं बायकोला अमूल्य भेट द्यावी आणि बायकोनं एका दणक्यात त्याचा चुराडा करावा अशी एक घटना मीरा भाईंदरमध्ये घडली आहे. मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या पत्नीला 5 कोटींची लॅम्बोर्गिनी कार भेट दिली. ट्रायल रन घेताना सुमन मेहता यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि लॅम्बॉर्गिनीनं एका रिक्षाला धडक दिली. कार अंगावर येत असल्याचं पाहून तिघी महिला धावल्या नसते, तर त्यांना जीवही गमवावा लागू शकला असता, असं प्रत्यक्षदशछनी सांगितलं. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नरेंद्र मेहता वादात अडकले आहेत.

bjp
27 ऑगस्ट रोजी नरेंद मेहता यांनी पत्नीला वाढदिवसाचं ‘सरप्राइज गिफ्ट’ म्हणून सुमारे साडेपाच कोटी रुपयांची भगव्या रंगाची लॅम्बॉर्गिनी स्पोर्ट्स कार भेट दिली होती. सोशल मीडियावरून स्वतः मेहता यांनीच कारचे फोटो शेअर केले होते. स्वाभाविकच, या शाही कारमधून फेरफटका मारण्यासाठी मेहता दाम्पत्य निघालं. सुमन स्वतः कार चालवत होत्या. सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी स्कूल या त्यांच्याच मालकीच्या शाळेच्या गेटमधून कार बाहेर आली आणि ती सुमन यांना वळवताच आली नाही. घाईगडबडीत त्यांना ब्रेक दाबायचंही भान न राहिल्यानं कार समोरच्या रिक्षावर जाऊन आदळली.

ही घटना घडली त्यावेळी कारमध्ये नरेंद्र मेहताही होते, मात्र कार सुमन मेहता चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी म्हटलं आहे. आश्चर्याचीबाब म्हणजे या अपघाताची कुठलीही तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. एवढचं नाही तर धडक बसलेल्या रिक्षाचं किती नुकसान झालं, रिक्षावाला कोण होता, याबाबतही काही माहिती मिळू शकलेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा