मुंबईत रिक्षाचालक संपावर, पुण्यात ओला टॅक्सींची तोडफोड

August 31, 2016 1:47 PM0 commentsViews:

347154-auto-union

30 ऑगस्ट :  ‘ओला’, ‘उबेर’ या खासगी टॅक्सी कंपन्यांवर सरकारने नियमाचे निर्बंध लागू करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने आज रिक्षा संप पुकारला आहे.  या संपात सुमारे लाखभर रिक्षा सहभागी झाल्या असल्याचा दावा शशांक राव यांच्या संघटनेने केला आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, या संपाचे पुण्यातही पडसाद उमटले आहेत. आरटीओ कार्यालयासमोरील दोन ते तीन ओला टॅक्सींची तोडफोड करण्यात आली.

संपाचा फटका सर्वसामान्य लोकांना बसू नये म्हणून बेस्टने जादा गाड्या सोडल्या आहेत. अनेक रेल्वे स्थानकावर बेस्टने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र या बस गर्दीच्या तुलनेने अपुऱ्या पडत आहेत. मुंबई शिवाय पुणे, नागपूर, आणि साताऱ्यातही संप पुकारावा असं आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आलं आहे.

दरम्यान, रिक्षा संघटनेचे शिष्टमंडळ दुपारी परिवहन आयुक्तांची भेट घेणार आहे. त्या बैठकीत तोडगा निघाल्यास सायंकाळी मुंबईकरांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या

मुंबईतील अवैध वाहतूक बंद करण्यात यावी
ओला-उबेर टॅक्सीसेवांवर तात्काळ बंदी घालावी
तीन वर्षांहून अधिक काळ रिक्षा चालविण्याचे लायसन्स धारण करणाऱ्या चालकांना बॅज मिळावा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा