बलात्कार, खून प्रकरणातील दोषींना पॅरोल नाही, राज्य सरकारचा निर्णय

August 31, 2016 2:09 PM0 commentsViews:

rape dsngfsdg

31 ऑगस्ट :  बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या दोषींना यापुढे फर्लो किंवा पॅरोल मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अॅडव्होकेट पल्लवी पूरकायस्थ बलात्कार आणि हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र शिक्षा भोगत असलेला सज्जाद मुघल पॅरोलवर बाहेर आला आणि त्यानंतर फरार झाला.

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत 21 दोषींनी पॅरोलवर असताना पलायन केलं आहे. त्यामुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील दोषीबाबत अशी घटना होऊ नये, यासाठी त्यांना पॅरोल न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फक्त बलात्कारातील दोषीच नाही तर दरोडेखोर, ड्रग कायद्याखालील दोषी, खून आणि आजन्म जन्मठेप शिक्षा सुनवलेल्या दोषींनाही पॅरोल किंवा फर्लो मिळणार नाही. राज्य सरकारने अद्याप यासंदर्भातील परिपत्रक जारी केलेलं नाही. मात्र ज्यादिवशी परिपत्रक जारी होईल, तेव्हापासून हा निर्णय लागू होईल.

दरम्यान, सरकारने फर्लो आणि पॅरोलबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फर्लोची सुट्टी 28 दिवासांवरुन 21 दिवस केली आहे. तर पॅरोल सुट्टी 90 दिवासांवरुन 45 दिवस करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा