शेअर मार्केट पुन्हा जैसे-थे

October 15, 2008 5:11 PM0 commentsViews: 16

15 ऑक्टोंबर, मुंबईदोन दिवस स्थिरता दाखवल्यानंतर आज भारतीय शेअर मार्केट पुन्हा घसरणीच्या मार्गाला लागलं. आज सकाळी ओपनिंगलाच दोन्ही इंडेक्सनी निगेटिव्ह मूड दाखवला होता आणि तोच ट्रेंड दिवसभर कायम राहिला. अशाप्रकारे मार्केटमध्ये घसरण वाढतच गेली. अखेरीस सेन्सेक्स 11 हजारांच्या खाली बंद झाला. बीएसई इंडेक्स 674 अंशांनी कोसळून 10 हजार 809 च्या लेव्हलला बंद झाला तर निफ्टी 180 अंशानी कमी होऊन 3 हजार 338 च्या लेव्हलला बंद झाला.आज कॅपिटल गुड्स, मेटल्स आणि ऑईल तसंच आयटी सेक्टर इंडेक्समध्ये जास्त घसरण दिसली. टॉप लूजर्समध्ये जेपी असोसिएट्स, रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स इन्फ्रा आणि एल अँड टी हे शेअर्स होते.

close