वहिनीची हत्या करून दिराची आत्महत्या

April 14, 2010 5:43 PM0 commentsViews: 14

14 एप्रिलदिराने वहिनीची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये ही घटना घडली. रामराव कालुसे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा नागपूर जिल्ह्यात राहणारा होता. नवी मुंबईत तो आपला भाऊ आणि वहिनी यांच्याकडे कालच आला होता. पण भाऊ आपल्या मुलांना घेऊन बाहेरगावी गेला असताना रामरावने काल रात्री वहिनीचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याची वहिनी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये काम करत होती. या घटनेमागील नेमके कारण अजून समजलेले नाही.

close