शहीद हेड कॉन्स्टेबल विलास शिंदेंचं नेत्रदान!

August 31, 2016 9:08 PM0 commentsViews:

Shinde213
30 ऑगस्ट : कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस शहीद विलास शिंदे यांचं नेत्रदान करण्यात आलं. शिंदे यांची नेत्रदान करण्याची इच्छा होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. विलास शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं नेत्रदान करून एक आदर्श घालून दिलाय.

खारमध्ये एका पेट्रोलपंपांवर उभे राहून शिंदे वाहनांची माहिती घेत होते. यावेळी एका दुचाकीस्वारासोबत त्यांची वादावादी झाली. त्यावेळी दुचाकीस्वाराने आपल्या भावाला बोलावून आणले. या दोघांनी शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीत शिंदे जखमी झाले. त्यातच त्यांच्या डोक्यातंर्गत रक्तस्राव झाल्याने ते कोमामध्ये गेले होते. बुधवारी शिंदे यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. विलास शिंदे यांच्या नेत्रदानाबद्दल शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी त्यांची इच्छापूर्ण करण्यासाठी लीलावती रुग्णालय नेत्रदान केलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव वरळीतील घरी आणण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा