शहीद विलास शिंदे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

September 1, 2016 10:12 AM0 commentsViews:

Vilas shinde123

01 सप्टेंबर :  मुंबईच्या वाहतूक विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या पार्थिवावर आज (गुरूवारी) साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विलास शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी शिरगावच्या गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंच्या डोक्यात  2 बाईकस्वारांनी लोखंडी रॉडने  हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आठ दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्यांच्या मेंदूच्या एका भागाला जबर मार बसल्याने, काल संध्याकाळी विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली.

विलास शिंदेंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी काल विविध राजकीय नेत्यांनाही हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तर शिंदे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय वरळी बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, विलास शिंदेंना श्‌्ा्रद्धांजली म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी आपला एक दिवसाचा पगार शिंदेंच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 30 ते 35 लाख रुपये गोळा होण्याचा अंदाज ट्रॅफिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा