किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच दिले मुलाला 28 चटके

September 1, 2016 9:13 AM0 commentsViews:

संजय शेंडे,अमरावती

01 सप्टेंबर :  अत्यंत क्षुल्लक कारणावरून स्वत:च्या पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे चटके देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या नराधम बापाला जामीनही मिळाला आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार इथल्या नैतिक खाडे यानं पाणी सांडलं म्हणून त्याच्या बापानं त्याच्या चुलीतल्या लाकडानं अंगावर 28 चटके दिले.

†ÖêÃÖßÖê®ÖÖêæÝÖ12

छोट्या नैतिकचं रडणं थांबता थांबत नाही आहे, कसं थांबेल? त्याच्या अंगाची चटक्यांनी आग आग होतं होती. नैतिकचा सख्खा बाप निलेश खाडे याने त्याला चुलीतल्या जळक्या लाकडानं अंगभर चटके दिले आहे. कारण काय तर पाणी आणायला सांगितल्यावर नैतिकच्या हातातून ग्लास खाली पडला. त्यामुळे चिडलेल्या निलेशनं नैतिकला चटके दिले. त्याच्या अंगावर गरम भाजीही फेकली एवढच नाही तर त्याला मारलंही. हे सगळं सहन न होणाऱ्या नैतिकच्या आईनं त्याला विरोध करायचा प्रयत्न केला, तेव्हा तिलाही निलेशनं बेदम मारहाण केली. शेवटी आई किरणनं बापाची नजर चुकवून नैतिकला दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी मग पोलिसांना फोन करून या क्रूर बाप निलेशला अटक केली. पण अटकनंतर काही वेळातचं त्याला जामीनही मिळाला.

मजुरी करणाऱ्या निलेशनं दारूचं व्यसन होत, तो दारूच्या नशेत नैतीकवर अमानुष छळ करण्याचे वेगवेगळे प्रयोग करायचा.

कधी पायाला बाधून उलटे लटकवून छोट्या नैतिकला अमानुषपणे मारहाण करायचा तर कधी पाण्यात बुडवून घाबरवायचा याचा विरोध करणाऱ्या किरणला जीवे मारायची धमकी द्यायचा या प्रकारामुळे हादरलेल्या नैतिकच्या आजोबांनी आपल्या मुलीला आणि नातवाला परत पाठवायचं नाही असं ठरवले.

या क्रूर बापाला लगेचच जामीन मिळाला. त्यामुळेच साहजिकच नैतिकचे आजोबा, आई संतापले आहेत. निलेशलाही कडक शिक्षा मिळावी, अशीच त्यांची मागणी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा