हसन अली सीडीची चौकशी करा

April 15, 2010 9:21 AM0 commentsViews: 4

15 एप्रिलहसन अली सीडी प्रकरण बनावट नाही. या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी माजी कायदामंत्री आणि जेष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी केली आहे.जेठमलानी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. हसन अलीने स्वीस बँकेत 8.2 अब्ज डॉलर ठेवले आहेत. त्याने 37 हजार कोटींचा इन्कम टॅक्सही बुडवला आहे, असे ते म्हणाले. हसन अलीने सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे हे प्रकरण महत्वाचे असल्याचेही जेठमलानी म्हणाले. तसेच परकीय बँकांच्या खात्यांमध्ये भारतीयांची 1500 अब्ज डॉलर रक्कम आहे. ती रक्कम गोठवून सरकारी तिजोरीत जमा करण्याची मागणीही त्यांनी केली.

close