‘आदर्श’ बेनामी फ्लॅट्सचा अहवाल पुन्हा सादर करा, हायकोर्टाने सीबीआयला फटकारलं

September 1, 2016 7:41 PM0 commentsViews:

aadarsh_मुंबई, 01 सप्टेंबर : आदर्श सोसायटीतल्या बेनामी फ्लॅट्स आणि त्यांच्या फायनार्न्सबाबत सादर केलेल्या अहवालप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला फटकारलंय. अहवाल चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढलाय. या प्रकरणी पुन्हा अहवाल तयार करुन 29 सप्टेंबरला सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

आदर्श बेनामी फ्लॅटप्रकरणी कन्हैयालाल गिडवाणी यांना अटक करताना बेनामी फ्लॅट प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचं सीबीआयनं म्हटलं होतं. पण त्याबाबत पुढं काय झालं याचा अहवाल सादर करताना सीबीआयनं तो चुकीच्या पद्धतीनं सादर केल्यानं कोर्टाने सीबीआयला फटकारलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा