नक्षलवादी हल्ल्यावरून संसदेत गोंधळ

April 15, 2010 9:28 AM0 commentsViews: 5

15 एप्रिलछत्तीसगडमधील दंतेवाडातील नक्षलवादी हल्ल्यावरून आज संसदेत कामकाज सुरू होताच गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. प्रश्नकाल स्थगित करावा आणि दंतेवाड्याच्या मुद्द्यावर तात्काळ चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. याप्रकरणी गृहमंत्री पी. चिदंबरम दुपारी 1 वाजता निवदेन देणार होते. पण विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

close