अडचणीच्या काळात बाळासाहेब शत्रूला खिंडीत गाठत नव्हते -मुख्यमंत्री

September 1, 2016 8:39 PM0 commentsViews:

01 सप्टेंबर : बाळासाहेब ठाकरे यांचं मन खूप मोठं होतं. बाळासाहेब फक्त आपल्या पक्षासाठीच नाही तर वेळ प्रसंगी विरोधकांनाही मोठ्या मनाने मदत करायचे. त्यांनी कधी अडचणीच्या काळात शत्रूला गाठले नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला.cm_on_uddhav_madh_vetrana

मध्य वैतरणा जलाशयाच्या नामकरण सोहळ्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच
टोलेबाजी झाली. मध्य वैतरणा जलाशयाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं. या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेची पाठराखण करताना प्रत्येक गोष्टीसाठी चौकशीचं शुक्लकाष्ठ कशाला असा सवाल उपस्थित केलाय.दिल्लीत तुंबलीये आता दिल्लीची चौकशी कराल का ? असा सवाल उपस्थित केला.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव करताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. अलीकडच्या राजकारणात आपण बघतो खूप वेळा नेत्यांची मन कमी कमी होतात. बाळासाहेब ठाकरे यांचं मन खूप मोठं होतं. बाळासाहेब फक्त आपल्या पक्षासाठीच नाही तर वेळप्रसंगी विरोधकांनाही मोठ्या मनाने मदत करायचे.

त्याच्या अडचणीच्या काळात देखील त्याला खिंडीत गाठायच्या ऐवजी त्याला जी मदत हवी ती करायची असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच शत्रूलाही मदत करून राजकारणात जी उंची आहे ती कायम ठेवायची अशी परंपरा जी कुणी सुरू केली असेल तरी बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली असे गौरवद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा