मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू

April 15, 2010 9:38 AM0 commentsViews: 2

15 एप्रिलमुंबईत सांताक्रूझमधील गारमेंट फॅक्टरीला लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. रामदेव गाला (वय 20), रमेश कारोट्रा (वय 19 ) बाबूराव वैद्य (वय 22), अशी या कामगारांची नावे आहेत.सांताक्रूझच्या खोतवाडी भागात ही फॅक्टरी आहे. ही आग विझवण्यात आता फायग ब्रिगेडला यश आले आहे.नाशिकमध्ये आगनाशिकमधील आडगावमध्ये बाफना वेअर हाऊसच्या कॅम्पसमध्ये सकाळी आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग मोठी असल्याने 25 फायर इंजिन्स आग विझवण्याचे काम करत होती. या वेअरहाऊसमध्ये मसाल्याचे पदार्थ, पेन्टस् अशा वस्तू होत्या.

close