राज्याचं गृहनिर्माण धोरण आज होणार जाहीर

September 2, 2016 9:54 AM0 commentsViews:

slum-mumbai

02 सप्टेंबर : राज्य सरकार आपलं गृहनिर्माण धोरण आज जाहीर करणार आहे. परवडणारी घर उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या अतिक्रमण झालेल्या जागेचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे धोरण घोषित करण्यात येणार आहे.

निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजप सेनेनं 22 लाख घर उपलब्ध होतील असा दावा केला होता. त्याची पूर्तता करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण आज जाहीर करण्यात येणार आहे. हे धोरण 3 टप्यात ठरवण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्यात शासकीय अतिक्रमण झालेल्या जमिनीचा पुनर्विकास करणे, दुसरा टप्पा मिठागरांचा भाग ज्यावर इमारती उभ्या राहिल्यात त्यांचा पूनर्विकास करणे तर तिसऱ्या टप्प्यात बीडीडी चाळ आणि धारावीचा पुनर्विकास करणे अस हे धोरण असणार आहे.  त्याचबरोबर मोकळ्या असलेल्या जागांवर म्हाडामार्फत निवासस्थाने बांधण्याचा संकल्प या नव्या धोरणात करण्यात आल्याचं समजते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा