राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 6 टक्के महागाई भत्तावाढ

September 2, 2016 10:07 AM0 commentsViews:

7th-Pay-Commission

02 सप्टेंबर :  राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी जानेवारीपासून रखडलेला 6 टक्के महागाई भत्तावाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. 1 सप्टेंबरपासून ही वाढ मिळणार आहे, मात्र गेल्या 8महिन्यांची थकबाकी नंतर देण्याचं जाहीर केलं आहे.

केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारीपासून 6 टक्के महागाई भत्तावाढ जाहीर केली होती. ती वाढ त्याच तारखेपासून मिळावी, अशी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची मागणी होती. या वाढीमुळे महागाई भत्त्याचा दर 119 वरून 125 टक्के झाला आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे साडेपंचवीस लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा