पाकिस्तानातील पेशावरमध्ये अतिरेक्यांचा हल्ला; 4 अतिरेक्यांचा खात्मा

September 2, 2016 12:02 PM0 commentsViews:

peshawar

02 सप्टेंबर :  पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून, यात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षारक्षकांना यश आले आहे. ही घटना पेशावरच्या ख्रिश्चन कॉलनीमध्ये हा हल्ला झाला आहे.

पाकिस्तानच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजता काही दहशतवादी ख्रिश्चन कॉलनीत घुसले. त्यावेळी तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

दरम्यान, सुरक्षारक्षकांनीही प्रतिहल्ला केला. या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा