जी सॅट – 4 चे आज लाँचिंग

April 15, 2010 9:44 AM0 commentsViews: 2

15 एप्रिलसंपूर्ण भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजीन असलेल्या जी सॅट -4 या उपग्रहाचे श्रीहरीकोटा इथून आज लाँचिंग होणार आहे. GSLV-D- 3 या रॉकेटमधून हा उपग्रह सोडला जाईल. दळणवळण आणि नॅव्हिगेशनसाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.स्वदेशी बनावटीचे क्रायोजनिक इंजीन वापरण्यात येत असल्याने इस्रोच्या आणि भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. 18 वर्षांच्या संशोधनानंतर हा प्रकल्प पूर्ण होत आहे.आतापर्यंत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीनकडे स्वत:चे क्रायोजनिक इंजीन्स असलेले रॉकेटस आहेत.

close