एक्स्प्रेस वेनंतर आता औरंगाबादमधल्या बेशिस्त वाहनचालकांवर ड्रोनची नजर

September 2, 2016 2:34 PM0 commentsViews:

02 सप्टेंबर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग करण्याचा प्रयोग होत आहे. तसाच प्रयोग औरंगाबादमध्येही ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी केला जाणार आहे. त्याची प्रायोगिक चाचणी करण्यात आली आहे.

ÖêÆüßÖê»ÖãÖê¾Ö

ट्रॅफिक कंट्रोलसाठी आणि ट्राफिक नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अवघ्या दोन दिवसात औरंगाबाद शहरातल्या रस्त्यावर आकाशात ड्रोन असणार आहेत. नियम तोडून पळणाऱ्या वाहनचालकांविरोधात सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करणं शक्य होणार आहे. औरंगाबाद शहरातील वाहतुकीचा ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच अभ्यास आणि सर्वेक्षण होत आहे. नियम पायदळी तुडवून वाहने चालविणारे या कॅमेऱ्यांत कैद होणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा