राम गोपाल वर्माचा फूँक – 2

April 15, 2010 9:50 AM0 commentsViews: 1

15 एप्रिलया आठवड्यात राम गोपाल वर्मा प्रेक्षकांना घाबरवायला येतोय फूँक – 2 घेऊन. रणच्या अपयशानंतर रामूचा हा सिनेमा रिलीज होतोय.. पण तो कधी मागे वळून पाहत नाही.. त्याचा प्रत्येक नवा सिनेमा त्याच जोमानं तो घेऊन येतो..राम गोपाल वर्मानं प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.. या शुक्रवारी रामू फूँक – 2 घेऊन येतोय.. त्याला स्पर्धा आहे पाठशाळा सिनेमाची. पाठशाळामध्ये शाहीद कपूर आहे आणि फूँक – 2मध्ये आहे, कावळा.. आता प्रेक्षकांना काय पाहायचंय ते ठरेल, असे रामू म्हणतो.सध्या राम गोपाल वर्मा बिझी आहे तो रक्तचंदन सिनेमात. त्यात विवेक ओबेरॉय आहे. रामू गॉड ऍण्ड सेक्स नावाचा सिनेमाही करतोय.. हा सिनेमा स्वामी नित्यानंद यांच्या सेक्स स्कॅण्डलवर आहे.त्यावर आपल्या आसपास इतके बाबा आहेत. त्यातील अनेकांचे बुरखे फाडले जात आहेत. तेव्हा मला वाटतं, या बाबांच्या आश्रमांच्या मागे काय चाललंय, हेही दाखवणे म्हत्त्वाचे आहे, असे राम म्हणतो…

close