उद्धवभाई तमेपण!, सेनेच्या गुजरातीत जाहिराती

September 2, 2016 5:10 PM0 commentsViews:

 sena_gujrati_poster

मुंबई,02 सप्टेंबर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेला गुजराती भाषिकांचाही पुळका आलाय. आज जाहीर केल्या जाणा-या पुनर्विकास धोरणाची गुजराती भाषेतील पोस्टर्स घाटकोपरच्या पंतनगर भागात झळकवण्यात आलीयेत.

मुंबईतील घाटकोपर भागात केतन त्रिवेदी यांनी ही पोस्टर्स लावली आहे.  ही पोस्टर्स गुजराती भाषेतली आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती शिवसेनेची वचनपुर्ती अशा आशया खाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषकांचा आणि मराठी माणसाचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेला कसा कळवळा आला असा सवाल उपस्थित केला जातोय. नेमका आताच शिवसेनेला गुजरात्यांचा पुळका कसा आला असा सवाल मनसेनं उपस्थिती केलाय. तर आम्हाला कोणत्याही भाषेचं वावडं नाही असं प्रतिउत्तर सेनेनं दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा