बंगलोरचा राजस्थानवर विजय

April 15, 2010 10:00 AM0 commentsViews: 1

15 एप्रिल आयपीएलमधील एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेट राखून पराभव केला. आणि या विजयाबरोबरच बंगलोर टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. मुंबई इंडियन्सनंतर सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ही दुसरी टीम ठरली. राजस्थान टीमने बंगलोरसमोर सपशेल हार पत्करली. कॅप्टन शेन वॉर्नने टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग घेतली. युसुफ पठाण आणि शेन वॉटसनवर राजस्थानची भिस्त होती. पण दोघे 22 आणि 11 रन्स करुन आऊट झाले.बंगलोरच्या तगड्या बॅटिंग ऑर्डरसाठी राजस्थानचे आव्हान कठीण नव्हते. त्यातच केविन पीटरसनने 29 बॉल्समध्ये 62 रन्स करत मॅच सोपी केली. तरीही राजस्थान टीमने प्रतिस्पर्ध्यांच्या पाच विकेट घेण्यात यश मिळवले.

close