शत्रूंशी लढू शकतो, घरच्यांशी नाही -एकनाथ खडसे

September 2, 2016 6:54 PM0 commentsViews:

khadse_4402 सप्टेंबर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी वाढदिवसानिमित्त केलेल्या शक्तिप्रदर्शनात स्वकीयांवरच निशाणा साधलाय. बाहेरच्या लोकांशी लढू शकतो आतल्या लोकांशी कसा लढू असा सवाल उपस्थित केलाय. तसंच गैरखानदानी लोकांनी दगा केल्याचा आरोपही खडसेंनी केलाय.

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकनाथ खडसेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. आजपर्यंत अनेक पक्षांच्या ऑफर आल्यात पण भाजपसाठी एकनिष्ठ राहून काम करत राहिलो. कधी मनात असा प्रश्नही निर्माण झाला नाही. नेहमी भाजप पक्ष मोठा झाला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न झाला. पण, दुदैर्वाने इथं असे लोकं आले  नाथाभाऊ विरोधकांशी लढू शकतो पण घरच्या माणसांशी लढू शकत नाही असं एकनाथ खडसे म्हणाले.

एखादा माणूस गद्दार होऊ शकतो. कधी एखादा माणूस बदनाम होऊ शकतो. पण, या ठिकाणी असं कोणतंही कारण नाही नाथाभाऊंना काढण्याचा. मी काय दरोड घातला, खून केलाय का ? जे मंत्रालयातून बाहेर काढलं. पण, दुख या गोष्टीचं आहे ज्यांनी कुणी आरोप केले ते गैरखानदानीचे होते अशी विखारी टीकाही खडसेंनी केली.  खडसेंनी घरचे म्हणून कोणाचा उल्लेख केला आणि खडसेंच्या लेखी गैरखानदानी कोण अशी चर्चा मुक्ताईनगरमध्ये सुरु होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा