ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांवर विनयभंगाचा गुन्हा

September 2, 2016 7:50 PM0 commentsViews:

02 सप्टेंबर : ठाणे जेलच्या अधीक्षकांनाच कारागृहात जावं लागतं की काय, अशी परिस्थिती आलीये. हिरालाल जाधव यांच्यावर एका महिला कॉन्स्टेबलनं विनयभंगाचा आरोप केलाय. हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणी जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.thane_jail

ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे वादग्रस्त कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव एकदा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या विरोधात आपल्याच एका महिला सहकार्याचा विनयभंग केल्या प्रकरणी ठाणेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकारानंतर असे गुन्हे या आधीसुद्धा या कारागृह अधिक्षकांकडून झाल्याचे तक्रारकर्त्या महिलेने ठाणे नगर पोलिसांना निदर्शनास आणले आहे.

ठाणे मध्यवर्ती कारगृहाचे वादग्रस्त कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या महिलेने ठाणे नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जाधव यांनी आपल्याला कामाचा बहाना करून 26 ऑगस्ट रोजी रात्री कळवा ब्रिज येथे बोलवले. यावेळी जाधव यांनी लंगट करत आपला हात पकडला आणि गैरवर्तन केले. त्यावेळी जाधव यांच्या तावडीतून आपली सुटका करून घरी गेली.

मात्र दुसऱ्यादिवशी जाधव यांनी मोबाईल वरुन आपल्याला अश्लील मैसेज पाठवत भेटण्याची मागणी केली. तसंच व्हाट्सअॅप वरुन माझे फ़ोटो पाठवले, असे पीड़ित महिला पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या तक्रारीत म्हटलंय. दरम्यान पीडित महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरुन ठाणे नगर पोलिसांनी हिरालाल जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपस ठाणे नगर पोलीस करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा