रिफॉर्म, परफॉर्म, ट्रांसफॉर्म आणि इन्फॉर्म हेच आमचं लक्ष -पंतप्रधान

September 3, 2016 12:07 AM0 commentsViews:

 

02 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेटवर्क 18 ला प्रदीर्घ अशी मुलाखत दिली. या मुलाखतीत राजकारण, काळा पैसा, आगामी उत्तर प्रदेश निवडणुका ते काश्मिरमधली अशांतता या सगळ्या विषयांवर पंतप्रधानांनी आपली मतं मांडली. गेल्या अडीच वर्षंतल्या कामगिरीचा आढावाही पंतप्रधानांनी या मुलाखतीत घेतला आहे. आगामी काळातली सरकारसमोरची आव्हानं या विषयावरही पंतप्रधान विस्तृतपणे बोलले. पंतप्रधान झाल्यापासूनची मोदींची ही सर्वात सविस्तर मुलाखत आहे. नेटवर्क 18 चे ग्रुप एडिटर राहुल जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे

- पराभवामुळे खेळाडूंची मेहनत आणि तपस्या कधी कमी होत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी  
- सव्वाशे कोटी भारतीयांमधून मी एक आहे – पंतप्रधान मोदी
- काम करणे ही माझी सवय आहे – पंतप्रधान मोदी
- मला राजकीय चष्मातून पाहू नका, मी जसा आहे तसाच आहे – पंतप्रधान मोदी
- माझ्या यशात माध्यमांचा मोठा वाटा – पंतप्रधान मोदी
- भ्रष्टाचार संपवणे हे आमचे सर्वात मोठे लक्ष्य – पंतप्रधान मोदी
- विकास आणि विश्वासामुळे काश्मीरमधील समस्येवर तोडगा शक्य – पंतप्रधान मोदी
- व्होट बँकेचं राजकारण देशाच्या विकासासाठी घातक – पंतप्रधान मोदी
- प्रत्येक विषयाला निवडणुकीशी जोडणे हे देशाचं सर्वात मोठं दुदझ्व – पंतप्रधान मोदी
- स्कील डेव्हलपमेंटला आज सगळ्यात जास्त मागणी आहे – पंतप्रधान मोदी
- राजकीय लाभा ऐवजी मी राष्ट्रनिती निवडली – पंतप्रधान मोदी
- गरीब आणि गरिबीच्या नावार आजपर्यंत आपल्या देशात खूप राजकारण झाले – पंतप्रधान मोदी
- गरिबी हटवण्यासाठी गरिबांना सशक्त करावे लागेल – पंतप्रधान मोदी
- सामाजिक एकता कायम राखण्यासाठी सांभाळून बोला, पंतप्रधान मोदींनी वाचाळवीर नेत्यांना फटकारलं
- जातीवादाचं विष देशाचा विनाश करत आहे – पंतप्रधान मोदी
- देशातील जनतेमध्ये भाजप सरकारबाबत कोणताही संभ्रम नाहीये – पंतप्रधान मोदी
- काळ्या पैशांबाबत नवा कायदा आल्यानंतर देशातून परदेशात पैसा पाठवणारे वाचणार नाही – पंतप्रधान मोदी
- राजकीय सूड भावनेनं कधी काम केलं नाही – पंतप्रधान मोदी
- काही कमतरता पाहून सुद्धा त्या सुधारण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो – पंतप्रधान मोदी
- आम्ही जेव्हा पहिलं बजेट सादर केलं त्याआधी संसदेत राजकारणावर एक श्वेतपत्रिका आणली पाहिजे होती -पंतप्रधान
- गेल्या दोन वर्षात दुष्काळाचा सामना केला, पण याच काळात परदेशी गुंतवणूक वाढली – पंतप्रधान मोदी
- रिफॉर्म, परफॉर्म, ट्रांसफॉर्म आणि इन्फॉर्म हेच आमचं लक्ष आहे – पंतप्रधान मोदी
- देशात आता कुठेही व्यवसाय करणे सोपे झाले आहे – पंतप्रधान मोदी
- यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला हवामानाने चांगली साथ दिली -पंतप्रधान मोदी
- जीएसटीमुळे केंद्र आणि राज्य सरकरांमधील अविश्वासाचं वातावरण दूर झालंय – पंतप्रधान मोदी
- आजारी अर्थव्यस्थेला गती दिली – पंतप्रधान मोदी
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर GST च्या रुपात सर्वात मोठा बदल झालाय -पंतप्रधान मोदी
- जनताच सरकारचं मुल्यमापन करते -पंतप्रधान मोदी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा