परभणीत मराठा समाजाचा भव्य मूक मोर्चा

September 3, 2016 5:25 PM0 commentsViews:

Parbhani1

03 सप्टेंबर :  कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेधार्थ उस्मानाबादेनंतर आता परभणीत मराठा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून हजारो आंदोलक सहभागी झाले होते. तसंच या मोर्चामध्ये अनेक महाविद्यालयीन तरुणीबरोबरच असंख्य महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

या विराट मोर्चाची सुरुवात नूतन महाविद्यालच्या मैदानावरुन शिवाजी पुतळ्यापर्यंत करण्यात आली. या विराट मोर्चामध्ये उपस्थित जनसमुदायाकडून कोपर्डी प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी द्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. हा विराट मोर्चा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा मानला जात आहे. पण या मोर्चेकऱ्यामुळं संपूर्ण परभणी शहर व्यापून गेलं होतं. रस्त्यांवर वाहनांना जाण्यासही वाट मिळत नव्हती.

यापूर्वी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि आता परभणीत हा मोर्चा मराठा समाजाच्यावतीने काढण्यात आला आहे. या विराट मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने एकप्रकारे आपल्या एकीचं दर्शन घडवल्याचे बोललं जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा