ठाण्यात मद्यधुंद कारचालकानं पोलीस हवालदाराला नेलं फरफटत

September 3, 2016 7:41 PM0 commentsViews:

êÖêËÖêê

03 सप्टेंबर :  पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच ठाण्यात या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. ठाण्यात एका मद्यधुंद कारचालकानं वाहतूक धडक दिली.

सुदैवानं कॉन्स्टेबल नरसिंग महापुरे यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी योगेश भामरेला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी योगेश भामरे तीन हात नाक्याकडे राँग साईडने आपली चारचाकी गाडी नेत होता. नरसिंग महापुरे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने नाशिकच्या दिशेने गाडी वळवली.

यावेळी म्हापुरे त्याच्या गाडीसमोर आल्याने त्याने त्यांनाही जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत गाडीसोबत फरफटत नेलं. यावेळी स्थानिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा