अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही – आठवले

September 3, 2016 10:07 PM0 commentsViews:

1265089_Wallpaper2

03 सप्टेंबर :  अॅट्रॉसिटी रद्द करण्याबाबत सध्या बऱयाच मागण्या होत आहेत, मात्र कोणत्याही परिस्थिती ऍट्रॉसिटी कायदा रद्द केला जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

सांगली येथे आयोजित एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यासाठी विविध स्तरावरुन मागणी होत आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात येणार नाही, मीच या खात्याचा मंत्री असल्याने माझ्याच हातात हे सर्व आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थिती हा कायदा रद्द होऊ देणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा