स्वस्त चायनीज मोबाईलवर बंदी

October 15, 2008 5:14 PM0 commentsViews: 14

15 ऑक्टोंबर, मुंबईसध्या बाजारात असलेले चायनीज मोबाईल फोन बंद करण्याचा निर्णय टेलिकॉम इंडस्ट्रीनं घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय. या मोबाईल फोनला अधिकृत आयएमईआय नंबर नसतो आणि गेल्या काही दिवसांत झालेल्या स्फोटादरम्यान आयएमईआय नंबर नसलेल्या फोनचा वापर करण्यात आला होता. यामुळं सिक्युरिटी एजन्सीच्या सांगण्यावरुन टेलिकॉम इंडस्ट्रीनं हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. देशात जवळजवळ 1 कोटी 6 लाख लोक चायनीज फोनचा वापर करतात.

close