जुगार छापे प्रकरणात पीआयने गमावली नोकरी

April 15, 2010 12:09 PM0 commentsViews: 3

15 एप्रिल सांस्कृतिक संस्थेच्या नावाखाली सुरू असणार्‍या जळगावातील तीन अड्‌ड्यांवर स्वत: पोलीस अधिक्षक संतोष रस्तोगी यांनी काल छापे टाकले होते. आज या प्रकरणी पीआय अशोक पाटोंड यांना निलंबित करण्यात आले आहे. तर इतर दोन अधिकार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी 56 आरोपींना जामीन मिळाला आहे.यात सहभागी असणारा माजी उपनगराध्यक्ष अरूण शिरसाळे अजून फरार आहे.गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जुगार अड्‌ड्यांविरूद्ध घेतलेल्या कडक भूमिकेमुळे ही धडक कारवाई सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

close