कोकणात जाणारी बस दरीत कोसळली, 2 ठार

September 4, 2016 1:15 PM0 commentsViews:

bus_accident04 सप्टेंबर : गणेशोत्सवापूर्वी गणेशभक्तांवर अपघाताचं विघ्न आलंय असं म्हणावं लागेल. मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला अपघात झालाय. अंजणारी घाटात हा अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जण ठार झाले असून 19 जण जखमी झाले आहे.

विशाल ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून देवगडला जात होती. अंजणारी घाटात चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत
कोसळली. आज पहाटे 3 वाजता हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर घाटात काही तास वाहतूक कोंडी झाली होती आता वाहतूक पूर्वपदावर आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा