…मग त्यांचा एकनाथ खडसे होतो, अजित पवारांचा टोला

September 4, 2016 1:43 PM0 commentsViews:

ajit_pawar_on_khadse304 सप्टेंबर : चार भिंतीच्या आत राहुनही न्याय मिळत नसेल तर मग एकनाथ खडसे यांच्यासारखी अवस्था होते असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खडसेंना लगावला. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

पिंपरी चिंचवड शहरातल्या शिक्षकांच्या गौरवानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमानंतर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी
अजित पवारांनी भाजपमधल्या अंतर्गत दुहीवर तोंडसुख घेतलंय. कोणत्याही पक्षात अंतर्गत कलह असतोच. काही जण पक्ष शिस्तीमध्ये राहून म्हणा किंवा चार भिंतीत राहुन त्यासंदर्भात भूमिका मांडता. पण तशी भूमिका मांडूनही न्याय मिळत नाही असं ज्यावेळी असं वाटायला लागतं त्यांचा एकनाथ खडसे होतो असा टोमणा अजित पवारांनी मारला. मुळात हा भाजपच्या अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी कसा सोडवावा हे त्यांनीच ठरावावं. पक्षाला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम आम्ही केलं पण सत्तेत येताच आम्हाला बाजूला सारलं असं खडसे म्हणाले होते. आता असं जर खडसे म्हणत असतील पक्ष चालवणाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं असा चिमटाही अजित पवारांनी भाजपला काढला.

दरम्यान, ह्या वेळी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला असता त्याला संयमाने उत्तर देत, ह्या घोटाळ्याबाबत आपलीही चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर, आपण आपली प्रतिक्रिया जाहीररित्या देणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा