मदर तेरेसा यांना संतपद बहाल

September 4, 2016 3:41 PM0 commentsViews:

04 सप्टेंबर : संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल करण्यात आले. रोममधील व्हॅटिकन सिटीमध्ये सोहळ्यात पोप फ्रान्सिस मदर तेरेसा यांना संतपद बहाल केलं. व्हॅटिकन सिटीमध्ये या सोहळ्यासाठी जगभरातील एक लाखांपेक्षा जास्त अनुयायी उपस्थिती होते. आता मदर तेरेसा यांना संत मदर तेरेसा या नावाने ओळखले जाणार आहे.

mother_teresaसेंट पिटर्स बेसीलिकवर मदर तेरेसा यांचा एक मोठा फोटो लावण्यात आला होता. या दरम्यान, भारतात कोलकाता आणि गोव्यासहीत अनेक शहरांमध्ये प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. मदर तेरेसा यांना संत उपाधी त्यांच्या 19 व्या पुण्यतिथीच्या एक दिवसाच्या आधी देण्यात आली. मदर तेरेसा यांचं 87 व्या वर्षी कोलकात्यामध्ये निधन झालं होतं. मदर तेरेसा यांनी गरिबांच्या सेवेचं कार्य कोलकाता शहरातून सुरू केली होती. गरिबांच्या सेवेच्या कार्यामुळे मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या त्या प्रमुखही राहिल्यात. जगातील सर्वात लोकप्रिय महिलेचा बहुमानही त्यांना मिळाला.

मेसेडोनिया ची राजधानी स्कोप्ये इथं कोसोवर अल्बानिया इथं 26 ऑगस्ट 1910 रोजी त्यांचा जन्म झाला. 1979 साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही प्रदान करण्यात आला. धर्मनिरपेक्ष टीकाकारांनी मदर तेरेसा यांच्यावर धर्मप्रचाराचा आरोपही केला. पण आरोप आणि टीका सगळ्या तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते. मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. ‘मोनिका बसेरा’, नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता.

पोप फ्रांसिस यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलं. लाखो अनुयायी या सोहळ्याला उपस्थितीत होते. पण, या सोहळ्यात त्यांच्यावर टीका करणारे मात्र दूर होते.

व्हॅटिकन सिटीमधल्या सोहळ्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा