नागपुरात हरतालिकेच्या पुजनासाठी गेलेल्या 6 महिला बुडाल्या

September 4, 2016 4:25 PM0 commentsViews:

Nagpur map04 सप्टेंबर : नागपुरात हरतालिका पूजनाला गालबोट लागले आहे. पूजनासाठी गेलेल्या सहा महिलांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडलीये.

हिंगणा तालुक्यात सांवगी इथं मंदाताई नागोसे (45) यांच्यासह प्रिया रामप्रसाद राऊत (17),जान्हवी इश्वर चौधरी (13), पुजा रतन ददमल (17), पुनम तुलसीराम ददमल (18),प्रणाली भगवान राऊत (16) या हरतालिका पुजनासाठी जवळच्या तलावात गेल्या होत्या. त्या गौराई धुण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण पाण्याच्या गाळात अडकल्यामुळे एकमेकींना वाचवणाच्या प्रयत्नात या सहाही महिलांचा मृत्यू झाला.  हरतालिका पुजनासाठी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुडालेल्या महिलांची नावं

मंदाताई नागोसे (45)
यांच्यासह प्रिया रामप्रसाद राऊत (17)
जान्हवी इश्वर चौधरी (13)
पुजा रतन ददमल (17)
 पुनम तुलसीराम ददमल (18)
प्रणाली भगवान राऊत (16)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा