थरूर सोनियांना भेटले

April 15, 2010 12:41 PM0 commentsViews: 7

15 एप्रिलआयपीएलच्या वादातून चर्चेत आलेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरूर यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. आणि सुमारे 15 मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. भाजप आणि डाव्या पक्षांकडून थरूर यांचा राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी सोनियांसमोर स्वत:ची बाजू मांडली. पण आता थरूर यांच्याबाबतचा निर्णय पंतप्रधान मनमोहन सिंग भारतात आल्यावरच होईल, असे समजते. सध्याच्या परिस्थितीत थरूर यांचा राजीनामा घेतल्यास तो विरोधी पक्षांचा विजय समजला जाईल. त्यामुळे काही काळाने त्यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

close