पुण्यात मानाच्या गणपतीची आज प्राणप्रतिष्ठा

September 5, 2016 10:45 AM0 commentsViews:

dagadushesth405 सप्टेंबर : महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन होत आहे. यानिमित्ताने पुण्यात मांगल्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा वगळता सर्व चार आणि अखिल मंडई गणेश मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या गणपतींचीही प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी सर्वच मंडळ श्रींची मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध पथके सहभागी होणार आहेत. गणपती उत्सवाची सुरुवात झालेल्या पुण्य-नगरीतील मानाच्या गणपतींचीही प्राण प्रतिष्ठा आजच होणार आहे.

पुण्यातले मानाचे गणपती

1. पहिला – कसबा गणपती
प्रतिष्ठापना – 11:36वा.
मिरवणूक – सकाळी 8. 30 वा.

2. दुसरा –   तांबडी जोगेश्वरी
प्रतिष्ठापना – दुपारी 1:15वा.
मिरवणूक – सकाळी 10. 30वा.

3. तिसरा – गुरुजी तालीम
प्रतिष्ठापना – दुपारी 12:45

4. चौथा – तुळशीबाग
प्रतिष्ठापना – साडेबारा वाजता
मिरवणूक – सकाळी 9 वा.

5. पाचवा – केसरीवाडा
प्रतिष्ठापना -10.30 वाजता
मिरवणूक – सकाळी 9 वा.

श्रीमंत दगडूशेठ गणपती -
प्रतिष्ठापना -11:01वा.
मिरवणूक -सकाळी 8 वा.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
प्रतिष्ठापना – सकाळी 11 वा.
मिरवणूक -सकाळी 8 वा.

अखिल मंडई गणपती
प्रतिष्ठापना – 11:52वा.
मिरवणूक -सकाळी 9 वा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा