सीबीएसई बोर्ड पुस्तकावरून विधानपरिषदेत गोंधळ

April 15, 2010 1:02 PM0 commentsViews: 2

15 एप्रिलसीबीएसई बोर्डाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आल्याच्या मुद्द्यावरून आज विधानपरिषदेत जोरदार गोंधळ झाला. यावरून विधानपरिषदेतील कामकाज 30 मिनिटासाठी तहकूब करावे लागले. सीबीएसई बोर्डाच्या सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करण्यात आला आहे. तसेच संत चोखामेळा यांच्याबद्दल जातीवाचक उल्लेखही पुस्तकात आहे, असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम पंडागळे यांनी उपस्थित केला. या मुद्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ झाला. आणि विधानपरिषदेतलं कामकाज 30 मिनिटासाठी तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला. आणि पुन्हा कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. दरम्यान याबाबत माहिती घेऊन कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर कारवाई करू, असे आश्वासन विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

close