जीएसएलव्ही – डी 3 अयशस्वी

April 15, 2010 1:53 PM0 commentsViews: 1

15 एप्रिलसंपूर्ण भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजीन असलेल्या रॉकेटचे श्रीहरीकोटा येथून झालेले प्रक्षेपण आज अयशस्वी झाले. या रॉकेटसोबत पाठवलेला जी सॅट – 4 हा उपग्रहही बंगालच्या उपसागरात कोसळला आहे. इस्त्रोचे संचालक के. राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली. प्रक्षेपणाच्या 500 सेकंदानंतर जीएसएलव्ही डी 3चा वेग, अक्षांश आणि रेखांशांची माहिती इस्त्रोच्या रडारवर मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यातील दोन क्रायोजेनिक इंजिनात दोष निर्माण झाला. दुसर्‍या टप्यानंतर ही दोन इंजिने सुरूच झाली नाहीत. त्यानंतर काही वेळातच इस्त्रोने प्रक्षेपण अयशस्वी झाल्याची घोषणा केली. इस्त्रोचेसंचालक के. राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली.दळणवळण आणि नॅव्हिगेशनसाठी या उपग्रहाची मदत होणार होती. स्वदेशी बनावटीचे क्रायोजनिक इंजीन वापरण्यात येत असल्याने इस्रोच्या आणि भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात होता. 18 वर्षांच्या संशोधनानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला होता. एक वर्षांनंतर पुन्हा हे प्रक्षेपण केले जाईल, असेही यावेळी के. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले.

close